जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील सहा शहरांमध्ये रत्नागिरी शहराचा समावेश
फयान, निसर्गसह अधुनमधून निर्माण होणार्या चक्रीवादळांपासून किनारीपट्टी भागातील शहरांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. जागतिक बँक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जलविज्ञान हवामान कृती योजनेत देशातील सहा शहरांमध्ये रत्नागिरी शहराचा समावेश केला आहे.
बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी ती शहरे सक्षम आहेत का, तिथे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे यावर लक्ष अभ्यास केला जाणार आहे. त्यादृष्टीने उपलब्ध निधितून ती शहरे सक्षम केली जाणार आहे. या संदर्भातील पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे नुकतीच झाली. यावेळी हायड्रोलॉजिस्ट सुजाना धरआणि शहर समन्वयक हर्षद धांडे हे उपस्थित होते.
www.konkantodaycom