चिपळूण शहरात कावीळतळी येथे पुतण्या कडून काकाचा खून
दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या चुलत्याच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याचा खून करण्याचा प्रकार चिपळूण शहरातील कावीळतळी भागात घडला आहे खून झालेल्या व्यक्तीचे नाव वसंत चिपळूणकर असे असून खून करणारा आरोपी पुतण्या गणेश चिपळूणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
कावीळतळी येथील रोहिदास वाडी येथे वसंत चिपळूणकर हे एकटेच राहत होते त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या त्यांचा पुतण्या गणेश चिपळूणकर याने दारुच्या नशेत वसंत यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्यांचा खून करण्याचा प्रकार घडला आहे
www.konkantoday.com