लायन्स क्लब चे विभागीय अधिकारी यांची रत्नागिरी क्लब ला अधिकृत भेट संपन्न

आजची रिजन चैअरमन यांची रत्नागिरी क्लब भेट अतिशय सुंदर रित्या पार पडली ! हात खंबा शाळेला मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा उपक्रम रतनागिरी क्लब च्या वतीने करण्यात आला ! खूप छान उपक्रम आहे ग्रामीण भागातील शाळांमधून असे उपक्रम हाती घेतले पाहिजे असे मत आर सी नितीन गांधी यांनी व्यक्त केले ! त्यानंतर झालेल्या बी ओ डी मीटिंग मध्ये रत्नागिरी क्लब चे पद्धतशीर व्यवस्थित ठेवलेले रेकॉर्ड व सर्वांना बरोबर घेऊन क्लब चे कार्य करण्याची क्लब च्या पदाधिकारी यांची कार्य पद्धती पाहून रिजन चैरमन भारावून गेले ! मुख्य कार्यक्रमामध्ये अध्यक्षा ला श्रेया केळकर यांनी आपल्या समयोचीत अभ्यासपूर्ण प्रास्ताविक मध्ये क्लब च्या कार्याचा घेतलेला आढावा सर्वांचे मन जिंकून गेला ! सचिव मनाली राणे खजिनदार डॉ शिवानी पानवलकर यांनी त्यांचे कार्य अहवाल अतिशय योग्य पद्धतीने सभागृहासमोर सादर केले ! आज च्या कार्यक्रमामध्ये सिरत राणे डॉ मोहसीन रेझा व श्री आपटे या तीन बँकिंग management आणि वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या उच्च विभूषित मान्यवरांना लायन्स क्लबचे नवीन सदस्य म्हणून शपथ विधी पार पडला ! एम जे एफ ला डॉ शेखर कोवळे यांनी सहज सुंदर रीत्या लायन्स क्लबचे कार्य ! संघटनेचे महत्व विशद करून सर्वांना शपथ दिली ! झोन चैरमन ला गुलाम पारीख व रिजन चैर मन ला नितीन गांधी यांनी आपल्या मार्गदर्शन मनोगतात रत्नागिरी क्लब च्या कार्याचे कौतुक केले ! क्लब च्या कर्तबगार महिला कशा उत्तम प्रकारे कार्यभार सांभाळत आहेत याचा प्रांतातील सर्व क्लब नी आदर्श घ्यावा रिजन चा प्रमुख या नात्याने मला रत्नागिरी क्लब चा अभिमान वाटतो ! मी क्लब अड्यक्ष ला श्रेया केळकर सचिव मनाली राणे खजिनदार डॉ शिवानी पानवलकर व लयनेस अध्यक्षा अड कार्तिकी शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो ! असे भावपूर्ण विचार मान ला नितीन गांधी यांनी व्यक्त केले ! या सुंदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ला शिल्पा पानवलकर यांनी पार पाडले ! या कार्यक्रमासाठी मान ला अरुण कदम ला श्रीनिवास परांजपे ला जगदीश ला सतीश पटेल व लायन्स क्लब रत्नागिरी चे सदस्य उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button