लांजा-वाकेड राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला युद्ध पातळीवर प्रारंभ
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या लांजा-वाकेड येथील चौपदरीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षापासून रखडलेले चौपदरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास ठेकेदार कंपनी व्यवस्थापनामार्फत व्यक्त करण्यात आला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सन २०१७ मध्ये प्रारंभ झाला. केंद्र शासनाची ठेकेदार कंपन्यांनी केलेल्या करारानुसार चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते.
www.konkantoday.com