कामगारांचे पगाराचे पैसे न देता स्वतःच हडप केल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल च्या तीन ठेकेदारावर अपहाराचा गुन्हा दाखल
कामगारांच्या पगारासाठी ठेकेदारांना कंपनीने दिलेले पैसे कामगारांना न देता स्वतःच हडप केल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल च्या तीन ठेकेदारावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बादल शांतीलाल शहा यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.एकूण १२ लाख ५४ हजार २४९ रुपयांचा हा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
या बाबत चिपळूण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण खेर्डी येथील थ्री एम पेपर मिल या कंपनीमध्ये सौरभ यादव,रवी यादव,आणि पंकज यादव रा.उत्तर प्रदेश हे ठेकेदार असून कंपनीत कामगार पुरवण्याचे काम हे ठेकेदार करत असतात.गेले कित्येक वर्षे हे लोक येथे ठेकेदारी पद्धतीवर परप्रांतीय कामगार पुरवण्याचे काम करतात.ठेका त्यांच्या नावावर असल्याने साहजिकच कामगारांच्या पगारांचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यात कंपनीकडून जमा केले जातात.त्याचाच फायदा आता या ठेकेदारांनी घेतल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com