हंगामी डॉक्टर्स, परिचारिका चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून अहोरात्र कार्यरत असलेले हंगामी डॉक्टर, परिचारिका गेल्या चार महिन्यांपासून वंचित राहिल्या आहेत. आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अत्यावश्यक सेवा कोणत्याही क्षणी बंद पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोविड योद्ध्यांना वेतन, अत्यावश्यक सुविधा वेळेवर देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कंत्राटी पद्धतीने जिल्ह्यात कार्यरत असलेले ७२ डॉक्टर्स, काही परिचारिका यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांची मानसिकता हळुहळू ढासळू लागली आहे.
www.konkantoday.com