मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १९ऑक्टोबर पासून सुरू होणार
तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १९ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार आहे
www.konkantoday.com