
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी तब्बल 20 फुटी हार
रत्नागिरी : नव्या सरकारमध्ये उद्योग मंत्री झाल्यानंतर ना. उदय सामंत प्रथमच रत्नागिरीत येत असून त्यांच्या स्वागतासाठी 20 फुटी हार सज्ज झाला आहे. हा हार घालून सत्कार केला जाणार आहे. मारुती मंदिर येथील शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांचा हा सत्कार केला जाणार आहे. हा हार वजनदार असल्याने त्याला उचलण्यासाठी क्रेनही बोलावण्यात आली आहे. हा भव्य हार कोल्हापूर येथून मागवण्यात आला आहे. कार्यक्रमाला रत्नागिरी शहरासह परिसरातील गावामधूनही ना. सामंत यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा भव्य असा व्हावा, यासाठी न.प.पालिकेसह ना. सामंत यांचे सर्व पदाधिकारी विशेष मेहनत घेत
आहेत.