चिपळूणच्या अपक्ष नगरसेविका सीमा रानडे यांनी भाजपचा पाठिंबा काढला
विकास कामासाठी भाजपला पाठिंबा देऊनही आपली विकासकामे अडवून ठेवल्याचा आरोप करत चिपळूणच्या अपक्ष नगरसेविका सीमा रानडे यांनी भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली आहे
विकासकामांसाठी भाजपला साथ दिली. पण कामे झालीच नाहीत. उलट माझी कामे अडवून ठेवली गेली. पक्षांतील वरिष्ठांच्या कानावर मी सर्व घातले, पण काही उपयोग झाला नाही, म्हणून मी भाजपातून आघाडीतून बाहेर पडत आहे, अशी घोषणा नगरसेविका सीमाताई रानडे यांनी रविवारी केली. यामुळे चिपळूण भाजपला पालिकेत मोठा धक्का मनाला जात आहे. अजूनही विकासकामे करण्यासाठी कितीही लढावे लागले तरी चालेल पण लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या
www.konkantoday.com