पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं लेडीच स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला
पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. अत्यावश्यक सेवेमध्ये प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठी रेल्वेनं सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये लेडीच स्पेशन ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळं लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. तसे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं एक पाऊल टाकलं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लेडीज स्पेशल लोकल मुंबईमध्ये चालवली जाणार आहे.
www.konkantoday.com