
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झालं आहे. बुधवारी वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. बेळगाव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपातर्फे ते निवडून गेले होते. मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री आहेत.
अनेक राजकारण्यांनी अंगडींच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला
www.konkantoday.com