कोरोना साथीच्या काळात कृषि महाविद्यालयाची घेतलेली वसतिगृहे ताब्यात देण्याची मागणी
मुंबईतुन येणार्या चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तसेच कोविड रूग्णांना ठेवण्यासाठी शासनाने दापोली येथील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थी वसतिगृहे ताब्यात घेतली होती. मात्र अद्यापही ती महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात न आल्याने आता विद्यार्थ्यांची राहण्याची पंचाईत होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर अनेक मुंबईकरांनी आपल्या गावाकडे येण्यास सुरूवात केली. या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा कमी पडू नये यासाठी दापोलीच्या तहसिलदारांनी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी वसतिगृहे ताब्यात घेतली होती. मात्र आता या वसतिगृहाचा उपयोग शासनाकडून होत नसल्याने ती वसतिगृहे परत देण्यात यावीत अशी मागणी कृषी महाविद्यालयाने केली आहे.
www.konkantoday.com