
महिला बचत गटामार्फत अस्मिता योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये अस्मिता योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जनजागृती करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
ग्रामीण, शहरी भागातील महिला, किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या कालावधीत मुख्य उद्देशाने राज्य शासनाने अस्मिता योजना दोन वर्षांपूर्वी सुरू केली. संवेदनशील असलेल्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे योजनेचा मुख्य उद्देश अद्यापही साध्य झालेला नाही.
योजनेचा मुख्य उद्देश सर्व संबंधितांपर्यंत पोहोचावा यासाठी महिला बचतगटांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, आरोग्य-बांधकाम सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, ग्र्रामीण विकास यंत्रणेचे प्र्रकल्प संचालक नितीन माने, अतुल साठे, निलेश ढमाले, चेतन शेळके, रविंद्र शिंदे, धनश्री आंब्रेे, सीमा सुर्वे, साक्षी सुर्वे आदी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com