आराध्य दैवतांच्या दर्शनासाठी धार्मिकस्थळे खुली करा – ॲड. दीपक पटवर्धन यांची मागणी

कोरोना महामारीला रोखण्यासाठी सुरु झालेले लॉकडाऊन संपुष्टात येवून व्यवहार पूर्ण पदावर येत आहेत. मात्र मंदिर, धार्मिक स्थळ बंद आहेत. आराध्य दैवताच्या दर्शनासापासून भाविक दुरावले आहेत. संकटकाळात आराध्य दैवताचे दर्शन मानसिक ताकद वाढवून संकटाविरुध्द लढण्याचा खंबीर आधार देऊ शकते त्यामुळे मंदिर, धार्मिक स्थळे सुरु करावीत ही सातत्याने होणारी मागणी दुर्लक्षित रहात असल्याने महाराष्ट्रभर विविध देवस्थान संस्थांनी आज घंटानाद करून शासनाचे लक्ष वेधण्याचा उपक्रम केला या आंदोलनाला सक्रीय पांठिबा भा.ज.पा. महाराष्ट्रने घोषित केला. मा.प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर घंटानादमध्ये भा.ज.पा.चे पदाधिकारी सहभागी होत आहेत. त्यानुसार रत्नागिरी मध्ये भा.ज.पा. चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घंटानाद करत सरकारच लक्ष वेधून महाराष्ट्र सरकारने नकारात्मक पवित्रा सोडून देवस्थाने, धार्मिक संस्था भक्तांसाठी खुल्या कराव्यात. योग्य काळजी, सुरक्षितता पाळत देवस्थाने सुरु व्हावीत ही मागणी घंटानाद करून करण्यात आली. रत्नागिरीचे जगप्रसिद्ध देवस्थान श्री.क्षेत्र गणपतीपुळे येथे भा.ज.पा. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, गणपतीपुळे देवस्थान अध्यक्ष डॉ.विवेक भिडे, प्रमोद केळकर, अभिजित घनवटकर, अवधूत केळकर, धोपटकर, सचिन दुर्गवळी आदीच्या उपस्थितीत घंटानाद करण्यात आला.
रत्नागिरी शहरात पतितपावन मंदिर येथे ॲड. दीपक पटवर्धन,ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. अशोक कदम, सचिन करमरकर, नगरसेविका सौ.रसाळ, सौ.रायकर यांच्या उपस्थितीत घंटानाद करण्यात आला. तसेच श्री. भैरी मंदिर, श्री.जुगाई मंदिर, जैनमंदिर, टिळक आळी, गणपती मंदिर, दत्तमंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरा समोर घंटानाद करून राज्यशासनचे लक्ष वेधण्यात आले.
या घंटानाद कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष सचिन करमरकर, श्री. बाबू सुर्वे, शहर सरचिटणीस ॲड. बाबा परुळेकर, ॲड. अशोक कदम, संकेत बापट, ॲड. गुरव, मिलिंद साळवी, नगरसेवक राजू तोडणकर, सौ.मानसी करमरकर, उमेश कुलकर्णी, सौ. सुप्रिया रसाळ, सौ.प्रणाली रायकर, संतोष नेने, व्ही.की.जैन, सौ.राजश्री शिवलकर आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी विविध मंदिरासमोर सहभागी झाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button