अखेर एशियन पेंट ने कोल्हापूर बाबतची जाहीरात मागे घेतली

एशियन पेंटने बनवलेल्या जाहिरातीमध्ये कोल्हापूरची टिंगल केली आहे. या जाहिरातीबद्दल कोल्हापूरकरांनी मोठा रोष व्यक्‍त केला. पेंटचा एकही ट्रक शहरात येऊ देणार नाही, असा इशारा अनेक राजकीय पक्षांनी दिला. दुकानांपुढे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. या पार्श्‍वभूमीवर कंपनीने ही जाहिरात मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.जाहिरातमध्ये लहान मुलांमध्ये सुट्टीत कोठे जाणार याबाबत चर्चा रंगते. एक मुलगा सिंगापूरला जाणार असल्याचे सांगतो. त्याचवेळी त्याचे वडील सांगतात की, आपण सिंगापूरला नाही तर कोल्हापूरला जाणार आहोतत्यावर ती लहान मुले सिंगापूर नाही कोल्हापूर असे म्हणून टर उडवितात. या जाहिरातून कोल्हापूरला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्याची भावना कोल्हापूरकरांत झाली. त्यामुळे ही जाहिरात मागे घेऊन कोल्हापूरकरांची माफी मागावी, अशी मागणी झाली. तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनी ही जाहिरात मागे घेऊन माफी मागावी, असे ट्विट केले होते.
दरम्यान, शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी एशिएन पेंटच्या विरोधात निदर्शने झाली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button