
जानेवारी महिना संपत आला तरी अंगणवाडी सेविकांना मागील डिसेंबर महिन्याचे मानधन नाही
जानेवारी महिना संपत आला तरी अंगणवाडी सेविकांना मागील डिसेंबर महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही.तसेच, आशा स्वयंसेविकांनाही ऑक्टोबरपासूनचा कामाचा मोबदला दिलेला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मानधन वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत राज्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांना कुटुंबाची उपजीविका भागविणे अवघड झाले आहे.राज्यात एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेंतर्गत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका काम करीत आहेत
www.konkantoday.com