
गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी १०२ कोटी रुपये, मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्यासाठी १८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर
रत्नागिरीतील पॉलिटेक्निकचे अपग्रेडेशन करून अभियांत्रिकी कॉलेज होणार आहे. पीपीपी तत्वावरील पहिलेच मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल प्रस्तावित असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी मंगळवारी दिली.
गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी १०२ कोटी रुपये, मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्यासाठी १८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासोबत रत्नागिरी एज्युकेशन हब म्हणून विकसित करण्याचा पुनरूच्चार ना. सामंत यांनी केला.
राज्यात एकमेव ठरणारे एक्सलन्स ३० कोटी रुपये खर्च करून उभारले जाणार आहे. यशवंत चव्हाण मुख्य विद्यापीठाचे केंद्र, विधी महाविद्यालय, एकमेवद्वितीय छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र, पर्यावरण पुरक प्राणी संग्रहालय रत्नागिरी तालुक्यात उभारले जाणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com