
खेड शहर मनसेची घरपोच गणपतीची सेवा
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी गर्दी टाळण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी गणपती कार्यशाळा ते नागरिकांच्या घरापर्यंत गणपतीची मूर्ती आणून देणार आहेत. नागरिकांनी बुकींग केलेली गणपतीची मूर्ती मनसेचे कार्यकर्ते घरपोच करणार आहेत. शहरामध्ये गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com