जिल्ह्यात सरासरी 83.42 मिमी पावसाची नोंद,मंडणगडमध्ये 112 मिमी पाऊस
गेल्या चोवीस तासात मंडणगड मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून तेथे 112.80 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात 24 तासात सरासरी 83.42 मिमी तर एकूण 750.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 112.80 मिमी, दापोली 68.20 मिमी, खेड 72.90 मिमी, गुहागर 82.90 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 100.10 मिमी, रत्नागिरी 64.80 मिमी, राजापूर 79.10 मिमी, लांजा 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले असून जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 06 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
मौजे पुरार-म्हाप्रळ रस्ता क्र.101 वर दरड कोसळल्याने सदर ठिकाणी रस्ता वाहतूक बंद केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम चालू आहे.
दापोली तालुक्यात मौजे सोवेली येथील श्रीमती सुशिला शंकर वासकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने अंशत: 35 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. विश्वास बारकू नरवणकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने 30 हजार रुपये नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही.
खेड तालुक्यात मौजे दापोली-खेड रस्ता क्र.162 वर पाणी आल्याने सदर ठिकाणी रस्ता वाहतूक बंद केली आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे नांदिवसे येथे श्रीमती वत्सला राजाराम निकम यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही. मौजे कळकवणे-दानवाडी येथील साकव कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही. मौजे वेरव येथील मंगेश कृष्णा कराडकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही. मौजे दमोली कोंड येथील शेवंती गोविंद गायकार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले जिवीत हानी नाही.
संगमेश्वर तालुक्यात मौजे कात्रुडी कोंडा येथे रस्त्याच्या बाजूला दरड कोसळल्याने शेजारी शेतीतील काजू व आंबा बागेचे अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही. मौजे पाली येथे बावनदी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद केली आहे. मौजे पाटगाव येथे महादेव गणपत भालेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे अंशत: 15 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे निवळीवाडी येथे आत्माराम देवळूकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने 8 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे कर्ले येथील विशाखा शिवराम जाधव यांच्या घराच्या पावसामुळे अंशत: 20 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे देवळे येथे कृष्णा आत्माराम इंगळे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 6 हजार 440 रुपये नुकसान झाले आहे. वासंती वासुदेव पांचाळ यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 26 हजार 680 रुपये नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यात मौजे शिरगाव येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद केली होती सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून सुरु केली.
राजापूर तालुक्यात मौजे राजापूर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी नदी पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मौजे कशेळी येथील निलेश रमेश सुतार यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही. सिताबाई पांडुरंग गोठणकर यांच्या घरावर सुपारीचे झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मोसम येथे युसूफ पावसकर यांच्या घरात पाणी शिरल्याने घराचे अंशत: नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com