कोकणसह मुंबईतील काही भागांत जोरदार पाऊस
राज्यातील मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून कोकणसह मुंबईतील काही भागांत जोराचा पाऊस कोसळत आहे. शहरातील उपनगरांत होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.
मुंबईत पावसाचा जोर अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहरात दुपारी भरतीची (हाय टाइड) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे
www.konkantoday.com