सेकंड हँड एक्टिवा विकण्याची जाहिरात करून तरुणाची एकोणचाळीस हजाराची फसवणूक
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील राहणाऱ्या सौरभ गुरव याला सेकंड हॅन्ड ॲक्टिवा स्कूटर विकायचे सांगून त्याची एकूण चाळीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे
नाखरे येथील रामेश्वर वाडी येथील राहणारा सौरभ गुरव त्याने ऑनलाइन वर सेकंड हॅन्ड ऍक्टिवा विकण्याची जाहिरात पाहिली होती सौरभ याला मोटर सायकलची गरज असल्याने त्याने जाहिरातीत दिलेल्या राजकुमार शेठ राहणार पवई मुंबई यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी शेठ यांनी एक्टिवा विकायची आहे असे सांगून स्कूटरची कागदपत्रे व आधार कार्ड आदी कागदपत्रे गौरव च्या व्हाट्सअप ला पाठवली त्यामुळे सौरभ याचा त्यावर विश्वास बसला त्यानंतर शेठ यांनी त्याला ऑनलाईन एकूण चाळीस हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी ऑनलाईन पैसे भरले हे पैसे भरूनही त्यांना मोटरसायकल दिली नाही सिक्युरिटी पोटी आणखी पैशाची मागणी केली त्यामुळे सौरभ त्याला संशय आला व त्याने ही रक्कम नाकारली त्यामुळे शेठ यांनी कोणतीही ॲक्टिवा स्कूटर न देता पैसे घेऊन सौरव यांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे कळताच सौरभ याने पूर्णगड पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com