फिनोलेक्स ऍकॅडमीने महाराष्ट्रात २२ वे तर मुंबई विद्यापीठात पटकावले सातवे स्थान
रत्नागिरी येथील फिनोलेक्स ऍकॅडमी मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने भारतात १५७ वे स्थान, महाराष्ट्रात २२ वे स्थान तर मुंबई विद्यापीठात सातवे स्थान पटकावले आहे.इंडिया टुडे यांच्यामार्फत दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. फिनोलेक्स समूहाचे दिवंगत अध्यक्ष पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून सन १९९६ साली स्थापन झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने गेल्या २४ वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल करून मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व नामांकन परिषद (नॅक) यांच्याकडून महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली आहे.
www.konkantoday.com