
वादळी वार्यांने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे, हातिस गावातील केळी, आंबा,सुपारी फणसाचीआदी साडेचारशे झाडांचे नुकसान
मुसळधार पावसासह शुक्रवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या वादळी वार्यांने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे, हातिस गावातील अवघ्या एक किलोमीटर परिसरातील सुपारी, नारळीच्या झाडांची वाताहात केली. चक्रीवादळाने भोवरा तयार झाला आणि काही क्षणात एकाच बागेतील साडेतीनशे सुपारीची झाडे कापून काढली. पन्नास केळी, आंबा, फणसाची भली मोठे झाडे यासह सुमारे साडेचारशे झाडांचे तीन लाखाचे नुकसान झाले.
www.konkantoday.com