रत्नागिरीत पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती घरबसल्या ऑडिओ कॉन्फरेन्स ने देण्यात अली.
पशुपालकासाठी पशुसंवर्धन व्यवसायास संजीवनी केंद्र शासनाने सन 2020-21 या आर्थिक वर्षात किसान केडीट कार्डची सुविधा पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणा – या शेतक – यासाठी उपलब्ध झाली आहे . या योजनेच्या माहिती खेडे गावातील शेतकऱ्यांना होण्यासाठी व प्रसारणासाठी रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देण्यासाठी पंचायत समिती रत्नागिरी चे पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. अभिजीत कसालकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .ऑडिओ कॉन्फरेन्स मध्ये डॉ. कसालकर यांनी किसान क्रेडिट कार्ड ची विस्तृत माहिती,नियम , अर्ज करण्याची मुदत, लाभार्थी निवड इत्यादी माहिती पशुपालकांना दिली. त्याचप्रमाणे पशुंपालकांनी त्यांचा प्रश्नाचे निरसन डॉ. अभिजीत कसालकर यांच्याकडून कडून करून घेतले. डॉ. अभिजीत कसालकर यांनी जास्तीत जास्त पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घेण्याचे आव्हाहन केले आहे. कार्यक्रमामध्ये राजापूर, लांजा, चिपळूण, रत्नागिरी तालुक्यातील पशुपालकांनी घरी बसल्या ऑडिओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड च्या कार्यक्रमध्ये सहभाग नोंदवला . रिलायन्स फाऊंडेशनचे कृषी तज्ञ श्री सचिन माताले यांनी इतर शासकीय योजनेची माहिति दिली . कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे यांनी केलं. सागरी हवामान , शाशकीय योजना व शेती , पशुपालन व इतर माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या निशुल्क क्रमांक १८००४१९८८०० वर सोमवार ते शनिवार सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन रिलायन्स फाउंडेशन मार्फत करण्यात आले.