राज्यात जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रीपद घटनाबाह्य, -अखिल भारतीय ग्राहक पंचायत
राज्यात जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रीपद घटनाबाह्य आहे. त्यामुळे ही राज्यातील सर्व पदे तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.मागणीसाठी ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी कोशियारी यांना पत्र पाठविले आहे.भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३ (१) मधील तरतुदीत पालकमंत्री या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुळात हे पदच घटनाबाह्य ठरते आहे. मग पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीकडून बैठका कोणत्या नियमाच्या आधारे घेतात? असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com