राजेश गोसावी यांची ‘ झी मराठी ‘ वर ‘ एक गाव भुताचा ‘ मालिका मधून छोट्या पडद्यावर एन्ट्री..!
जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटात पूर्णपणे चित्रपटसृष्टी, नाट्यविभाग, टेलिव्हिजन पूर्णपणे ठप्प झाले होते.यातूनच यावर मात करण्याचा विचार,नियम अटी पाळून,अंगी बाळगून, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रंगकर्मींनी प्रयत्न केला,या सगळ्या प्रयत्नातून नवीन मालिका आपल्या समोर आली.
वैभव मांगले यांचा पुढाकार,आणि प्रफुल्ल घाग यांच्या सहकार्याने, रत्नागिरी स्थानिक कलाकारांना संधी देऊन झी मराठी चॅनल वर ” एक गाव भुताचा ” ही मालिका सुरू झाली.याच मालिका मध्ये राजेश गोसावी सर यांची प्रकाश या पात्रासाठी निवड झाली.राजेश गोसावी सर हे व्यवसायाने केंद्रशाळा झरेवाडी येथे पदवीधर शिक्षक आहेत.तर लांजा येथील अग्रगण्य सांस्कृतिक चळवळ ‘ संस्कृती फाऊंडेशन ‘ चे संस्थापक आहेत.दोन्ही क्षेत्र वेगळी असताना सरांनी दोन्ही क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवली आहे.
नाट्य क्षेत्रातील त्याचा प्रवास जाणून घेत असताना,नाटक यामध्ये नट म्हणून सामोरे जरी आले असले.
तरी अनेक एकांकिका मध्ये त्यांचा लेखनासह, अभिनय, दिग्दर्शक,असाही प्रवास दिसून येतो.अनेक जनजागृती, बोधक पथनाट्य मध्येही सरांचा सहभाग असतो.इतकी वर्षे गाव पातळीवर काम करत असताना एक रंगकर्मी,त्यांना इतकं मोठं झी मराठी व्यासपीठ मिळणं ही खरच आनंदाची गोष्ट आहे. स्थानिक कलाकारांकडून नवीन करण्याचा विचार जेव्हा नावाजलेले ,विनोदी,कोकण पुत्र वैभव मांगले सर करत आहेत.यापेक्षा अजून कोकणवाशी रंगकर्मींना काय हवं..! ही मालिका १८ जून पासून झी मराठी या चॅनल वर नियमित प्रसारित होत आहे. या मालिकेमध्ये भोसले निर्माता
कार्यकारी निर्माता प्रफुल्ल घाग,लेखक राजू घाग, कॅमेरामन प्रसाद पिलनकर, दिग्दर्शक व एडिटिंग ची जबाबदारी निखिल पाडावे यांनी पार पाडली. अजिंक्य कोल्हटकर सह दिग्दर्शन, अप्पा रणभिसे, सौरभ सावळ हेदेखील उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. तर तेजश्री पिलणकर यांनी रंगभूषा तर वैदेही पटवर्धन यांनी वेशभुषा सांभाळली. सुनील बेंडखळे यांना कला दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत तर जॉनी आपकरे, ऋषिकेश शिंदे त्यांना सहकार्य करत आहेत.
राजेश गोसावी याना वैभव मांगले या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा खूप छान अनुभव मिळाला.त्याबाबत त्यांनी समाधानदेखील व्यक्त केले. आपल्यासोबतच्या सर्वच कलाकारानीदेखील आपल्याला सुंदर साथ दिली आणि सांभाळून घेतलं असंही ते म्हणाले. सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ स्थानिक आहेत ही त्यातली महत्वाची बाब. या मालिकेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कलाकारांना संधी मिळाली आहे.
राजेश गोसावी सर शिक्षक असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे.आपल्या लाडक्या सराना पडद्यावर पाहताना विद्यार्थी वर्ग, मित्रपरिवार व स्थानिक रहिवाशी वर्ग आणि रसिक वर्ग यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.