भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) चिपळूणच्या ऋतुराज बाबासो जगताप यांची नियुक्ती
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) चिपळूणच्या ऋतुराज बाबासो जगताप या तरुणाची सायंटिफिक इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे चिपळूणचे नाव पुन्हा एकदा देशाच्या नकाशात ठळकपणे दिसणार आहे. कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ऋतुराज हा इस्रोमध्ये कार्यरत झालेला पहिलाच तरुण ठरला आहे.अशा या चिपळूणच्या ऋतुराज जगताप याची केरळ राज्यातील तिरूवनंतपुरम येथील इस्रोच्या संशोधन केंद्रात नियुक्ती झाली आहे. इस्रोमध्ये निवड झालेला ऋतुराज हा जिल्ह्यातील चिपळुणातील पहिलाच असल्याचा आनंद त्याच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे.
शहरातील काविळतळी भागात वास्तव्यास असलेल्या ऋतुराजचे आई-वडील माध्यमिक शिक्षक आहेत
www.konkantoday.com