
मनसेने सदावर्तेंवरील उपचारांसाठी घेतली मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांची वेळ*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. अॅड. सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा दावा करीत येथील मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगरमधील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. झालानी यांची वेळ घेतली आहे.येत्या 1 फेब्रुवारीला अॅड. सदावर्ते तुमच्याकडे उपचारांसाठी येतील, असे पत्रही त्यांनी डॉ. झालानींना दिले आहे व त्याची माहितीही अॅड. सदावर्ते यांना पत्र पाठवून दिली आहे.यासंदर्भात सुमित वर्मा यांनी डॉ. झालानी यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, गुणरत्न सदावर्ते हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यातून टीका करीत आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना लवकर बरे करावे, यासाठी त्यांची वेळ आपल्या दवाखान्यात आरक्षित ठेवावी म्हणून विनंती करतो.येत्या 1 तारखेला ते आपल्याकडे उपचारासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. आपण योग्य तो उपचार करून त्यांना बरे करावे, ही विनंती, असे यात म्हटले आहे.त्यासोबतच अॅड. सदावर्ते यांनाही पत्र पाठवले आहे.त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला मानसिक रोग जडल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडून विविध विषयांवर कारण नसताना व संबंध नसताना टीका केली जात आहे. त्यामुळे आपल्याला काही मानसिक आजार झाला आहे, असे जाणवत आहे.www.konkantoday.com