
मंत्री,राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानांना महाराष्ट्र राज्यातील गडकोट किल्ले यांच्या नावाने ओळखले जाणार….
मंत्री उदय सामंत यांची संकल्पना सत्यात
उदय सामंत यांचे ब 2 निवासस्थान ” रत्नसिंधू ” या नावाने ओळखले जाणार …
मुंबई मध्ये मंत्री,राज्यमंत्री यांची शासकीय निवासस्थाने असून गेली अनेक वर्षे या वास्तुने अनेक मंत्री,राज्यमंत्री याना स्थान दिले आहे.या वास्तूनी अनेकांची ओळख तयार केली पण या वास्तू स्वतःची ओळख अ,ब,क आणि 1,2,3 या नावानेच ओळखल्या जात होत्या.
उदय सामंत हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मंत्रिमंडळात आले आणि त्यांना ब 2 हे शासकीय निवासस्थान मिळाले.नेहमीच कल्पकतेने काम करणाऱ्या मंत्री उदय सामंत याना ही बाब रुचली नाही.आपण ज्या ठिकाणी राहतो,काम करतो त्या वास्तूला पण स्वतःची ओळख असावी,स्वतःचे नाव असावे हा विचार त्यांना सतावत होता आणि त्यांनी तातडीने मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना पत्रव्यवहार करून या शासकीय बंगल्याना गड किल्ल्यांची नावे देणेबाबत पत्रव्यवहार केला.नुसता पत्रव्यहार करून न थांबता तो सत्यात उतरवण्यासाठी पाठपुरावा करून तो सत्यात आणला.आता मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना स्वतःची ओळख निर्माण झाली आहे, ती गड किल्ल्यांच्या नावाने.ही नावे अशी आहेत जी प्रत्येक माणसाच्या मनात आपल्या राज्याचा इतिहास कायम प्रज्वलित ठेवतील आणि याचे सगळं श्रेय जाते ते मंत्री उदय सामंत याना.
अगदी आतापासून या पुढे भविष्यात या बंगल्याना ज्या ज्या वेळी त्यांच्या नावाने ओळखले जाणार आहे त्या त्या वेळी एक नाव नक्कीच घेतले जाईल ते म्हणजे उदय सामंत यांचे.
आणि वास्तूला पण एक मन असते आज या वास्तू पण म्हणत असतील मला आज या माणसामुळे एक स्वतंत्र ओळख मिळाली.