मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणावर औषध तयार केलं

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाचा आकडा साडेतीन लाखांहून अधिक झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारसाठी डोकेदुखी वाढली आहे. याच दरम्यान आता नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणावर औषध तयार केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाला भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) यांनीही परवानगी दिली आहे.
कोविड 19 च्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी अँटिव्हायरल औषध फेविपिरावीरला फैबिफ्लू नावाने पुढे आणलं आहे. शनिवारी याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली.देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 103 रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत उपलब्ध होईल’, असं ग्लेनमार्क फार्मास्युटिल्सचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button