सिंधुदुर्गात आज आरटीपीसीआर कोविड-19 रोगनिदान सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे आज दि. १९ जून रोजी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटनाचा सोहळा दुपारी १२वाजता संपन्न होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत हे असणार आहेत. या सोहळ्यास जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोक प्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.
www.konkantoday.com