
होमिओपथी औषधाने कोरोना रूग्ण बरा होतो, नामवंत होमिओपथी डॉ. शिवाजी मानकर यांचा दावा
कोरोनावर होमिओपथी औषधाने मात करता येते. आपल्या सल्ल्याने होमिओपथी औषध घेतलेले तीन रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचा दावा चिपळूण येथील नामवंत डॉ. शिवाजी मानकर यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला. मानकर यांनी देशात कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर तीन महिने मेहनत घेवून कोरोनावर लागू पडेल अशा औषधाचा फॉर्म्युला शोधून काढला. होमिओपथी औषधात कोरोनावर मात करण्याची क्षमता आहे. आपण तयार केलेल्या औषधाने तीन कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील धामेली आणि चिपळूण शहरातील एका भागात झालेल्या रूग्णावर मी दिलेल्या होमीओपथी औषधाने ते बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढे भविष्यात गरजवंत आपल्याकडे संपर्क करतील अशांना आपण औषध उपलब्ध करून देवू शकतो. जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख व सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com