कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये-आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांना बेड्सची कमतरता पडत आहे. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्णही रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात भरती होत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्ीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्यात. रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.ज्या पॉझिटिव्ह रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
www.konkantoday.com