तुम्ही परप्रांतीयांचे नव्हे तर मुंबई-महाराष्ट्राचे खासदार आहेत, हे विसरु नये, – नितीन सरदेसाई
परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी परत गेल्यानंतर महाराष्ट्रात मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेचे काही नेते मराठी तरुणांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला आहे. शिवसेना स्वत:चाच इतिहास विसरत चालली आहे. ‘बजाव पुंगी,हटाव लुंगी’, एअर इंडिया मध्ये केलेली आंदोलनाचा शिवसेनेला विसर पडल्याचे टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडले.परप्रांतीय मजूर गावी गेल्यानंतर मराठी तरुणांना संधी उपलब्ध झाली आहे.त्यानुसार मराठी तरुण उत्तम काम करत आहेत. या तरुणांच्या मागे ताकदीने उभ राहायचे सोडून शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणतायत की, मराठी तरुण काही करु शकत नाहीत. त्यांना काही जमणार नाही. मराठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचे खच्चीकरण अरविंद सावंत करत आहेत. हे सहन करुन घेतले जाणार नाही. दिल्लीत गेलेला माणूस बदलतो हे ऐकलं होतं, पण माणसं इतकी बदलतील असं वाटल नव्हतं. सावंत यांनी ते परप्रातीयांचे नव्हे तर मुंबई-महाराष्ट्राचे खासदार आहेत, हे विसरु नये, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला.
www.konkantoday.com