
महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे-सामना मधून केद्रांवर टिका
महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात अजून पोहोचलेला नाही, परंतु सरकारे पाडण्यासाठी पथके आणि निधी मात्र पोहोचत आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
‘देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्ते पक्षाला विरोधकांची सरकार पाडण्याची थेरं सुचणे हे धक्कादायक आहे. देशात एकाच दिवशी १०हजार रुग्ण व्हावेत, यावर केंद्र सरकार चिंता करायला तयार नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले.
संकटात केंद्रीय मदतीचा हात अजून पोहोचलेला नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी पथके व निधी मात्र पोहोचत आहे.
www.konkantoday.com