पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबोली घाटातील मुख्य धबधबाही प्रवाहित

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल गुरुवारी दुपारी मान्सूनचे जोरदार आगमन झाले. मान्सूनच्या या आगमनाबरोबरच वर्षा पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबोली घाटातील मुख्य धबधबाही प्रवाहित झाला. गेले काही दिवस अधूनमधून झालेल्या पावसामुळे गुरुवारी घाटातील मुख्य धबधब्यासह घाटमार्गातील इतर लहान धबधबेही प्रवाहित झाले आहेत. यापुढे पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या आठवड्याभरात येथील मुख्य धबधब्यासह सर्वच धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतील, अशी शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे आंबोली परिसरातील सर्व नद्या, ओहोळ व नालेही प्रवाहित झाले असून, पाण्याची पातळीदेखील वाढली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button