राज्य सरकारचा चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय
राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत ९५ हजार इतकी दिली जात होती. राज्याते मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्य सरकारने NDRF नियमांच्या पलिकडे जाऊन मदत करणे आवश्यक आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. राज्य सरकारने तसाच निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.
कोणाला किती मदत मिळणार?
घर पूर्ण नष्ट – दीड लाख रुपये
काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना ६ हजाराऐवजी १५ हजार मिळणार
घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे त्यांना ३५ हजार मिळणार
NDRF च्या निकषांच्या वरती जो खर्च लागेल तो राज्य सरकार देणार
नुकसान झालेल्यांना १० हजार रोख रक्कम देणार
शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून ५० हजार रुपयांची मदत
कम्युनिटी किचन सुरु करणार
पुढील दोन महिने मोफत धान्य देणार
www.konkantoday.com