रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना उतरवले जाण्याची शक्यता
पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात यावेळी अधिक ताकदीने उतरण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रत्नागिरीतील टक्कर राज्यासाठी लक्षवेधी ठरेल.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेना आधीपासूनच मोठा पक्ष आहे. मात्र आता ही ताकद विभागली गेली आहे. वर्षानुवर्षे ही जागा युती म्हणून भाजपकडे होती. त्यामुळे शिवसेनेमधून येथे आमदारकीसाठीचे नेतृत्व आतापर्यंत पुढे आलेले नाही. २०१४ मध्ये शिवसेना या जागेवर स्वतंत्रपणे उभी राहिली आणि तेव्हा उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तेव्हापासून येथील नेतृत्व त्यांच्याकडेच आहे.
आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत जे पदाधिकारी आहेत, ते पक्ष म्हणून आजवर खूप राबवले असले, तरी विधानसभा निवडणूक लढवणे आणि त्यातही मंत्री असलेल्या उदय सामंत यांना टक्कर देणे यासाठी ते तयारीचे नाहीत.त्यामुळे येथे गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वी रत्नागिरीत आलेल्या भास्कर जाधव यांनीही याबाबत सूतोवाच केले होते. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास रत्नागिरीतून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Www.konkantoday.com