
आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रखडले
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना कोणतीही सुरक्षा घेतली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी धोकादायक स्थितीत सुरू आहे. मात्र त्याही ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनाचे अपघातही घडत असून जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आलेले आहे. मात्र अनेक ठिकाणी मोर्या तसेच इतर बांधकामाचे काम रखडले आहे. धोकादायक ठिकाणी मोठे खड्डे काढून काम अर्धवट सोडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात घडत आहेत. चौपदरीकरणाचे काम करत असताना महामार्गावर धावणार्या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक असते.
www.konkantoday.com