सिंधुदुर्गात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रम कायम
रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांची वाढ होत आहे. रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील संशयित कोरोना रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज व कोल्हापूर येथे पाठविण्यात येत आहेत. मात्र त्या ठिकाणी अतिरिक्त भारामुळे हे अहवाल येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे आता रत्नागिरी येथे १५ दिवसात कोरोना स्वॅब टेस्टिंगची लॅब होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्गातही कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅबला मान्यता दिल्याचे लोकप्रतिनिधींनी जाहीर केले आहे. मात्र रत्नागिरी येथील खलिल वस्ता या नागरिकाने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये सरकारची बाजू मांडताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तपासणी केंद्र देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता शासनाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित अधिकार्यांना न्यायालयासमोर २ जून रोजी आणण्यात यावे असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे शासनाने न्यायालयात दिलेली माहितीचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅब उभारली जाणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com