
वनविभाग कार्यालयात येवून गाेंधळ करुन सरकारी कामात अडथळा आणणार्या लाकूड व्यावसायिका विरुध्द गुन्हा दाखल
मौजे भिंगरोळी मंडणगड येथील वनविभाग परिमंडळ कार्यालयात बसलेल्या दौलत भोसले, परिमंडळ वनाधिकारी यांना कार्यालयात येवून धमकी देवून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून इकबाल मुकादम (रा. मांदिवली, दापोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी भोसले हे परिमंडळ वनअधिकारी मंडणगड कार्यालयात वनअधिकारी म्हणून काम करतात. ते कार्यालयात वनरक्षक अनंत मंत्रे यांच्यासह बसलेले असताना या ठिकाणी लाकूड व्यावसायिक इकबाल मुकादम हे कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीशी हुज्जत घालून, आरडाओरडा करून फिर्यादी भोसले यांना या कार्यालयात काम करायचे नाही, इथे बसायचे नाही असे सांगून धमक्या दिल्या व सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे भोसले यांनी मुकादम यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
www.konkantoday.com