होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरते म्हणून चौकशी केल्याच्या रागातून नागरी कृती दलाचे सदस्याला मारहाण
होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरते म्हणून चौकशी केल्याच्या रागातून नागरी कृती दलाचे सदस्य संजय कदम यांना बेदम मारहाण केली. ही घटना गुहागर शहरा मध्ये घडली. यासंदर्भात संजय कदम यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संजय कदम यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुरववाडीतील रविराज बेंडल हे पुण्यातून गुहागरला आले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र गेले काही दिवस नियम बाजूला ठेवून ते शहर परिसरात फिरत होते. नागरी कृती दलाचे सदस्य असलेले संजय कदम यांच्या निर्दशनास ही गोष्ट आली. त्यामुळे त्यांनी बेंडल यांची होम क्वारंटाईनची मुदत संपली आहे का अशी विचारणा नगरपंचायत कर्मचारी सुनील नवजेकर, तसेच कृती समितीचे सदस्य दिलीप गुरव यांच्याकडे केली.त्याचा राग येवून रविराज बेंडल, धनंजय दणदणे, अशोक बेंडल यांनी संजय कदम यांना बेदम मारहाण केली.
www.konkantoday.com