हर्णे येथे मृतावस्थेत आढळला डॉल्फिन, मे महिन्यातील तिसरी घटना
हर्णे नवानगर येथे पुन्हा एकदा याच महिन्यात डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडल्यामुळे तिसर्यादा अशाप्रकारे डॉल्फिन मासा मृत होऊन समुद्रकिनारी सापडण्याचे नेमके कारण वनविभागाने शोधून काढणे गरजेचे आहे. वारंवार हे असे डॉल्फिन माशांच्या बाबतीत होत असल्यामुळे निसर्गप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.
दापोली तालुक्यातील सालदुरे, पाळंदे येथे समुद्र किनारी गेल्या काही दिवसांपूर्वा एक मृत डॉल्फिन सापडला होता ही बाब ग्रामस्थांनी पत्रकार व वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फिनला समुद्रकिनारी खड्डा करून पुरून टाकले ही घटना ताजी असतानाच रविवारी ३मे रोजी दुसऱ्या एका डॉल्फिनचा मृतदेह समुद्रातून वाहून येऊन किनाऱ्याला पडलेला आढळून आला. एकाच आठवडयात दोन डॉल्फिनचा एका समुद्रकिनारी मृत्यु ओढवल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. या डॉल्फिनला देखील कुजलेल्या अवस्थेत असल्याने तेथेच खड्डा काढून पुरला. काही दिवसांपूर्वा गुहागर येथील समुद्रकिनारी देखील मृत डॉल्फिन सापडला होता.
परंतु आता एकाच महिन्यात केवळ २० दिवसांनी पुन्हा एकदा हर्णे नवानगर येथे मृतावस्थेत डॉल्फिन सापडला. दापोली तालुक्यातली या दोन महिन्यातली मृत डॉल्फिन किनाऱ्यावर सापडण्याची ही तिसरी घटना आहे. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वाच हा डॉल्फिन किनाऱ्याला लागला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. सदरचा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत असल्याममुळे घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचार्यानी हजर राहून पंचनामा करून ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने तिथेच पुळणीत खड्डा काढून पुरला.
यावेळी हर्णे परिसरातील ग्रामस्थ, सर्पमित्र प्रितम साठविलकर, दापोली वनाधिकारी, कर्मचारी, श्रीम.जगदाळे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com