लॉकडाऊन काळात रत्नागिरी जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणात मदत
रत्नागिरी जैन समाजा तर्फे कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिनांक २२ मार्च २०२० पासुन रत्नागिरीतील सिव्हिल हाॅस्पीटल व पोलीस डिपार्टमेण्ट,पोलीस मित्र,काही निवारण केंद्र व रेल्वे स्टेशन वरील चेक पोस्ट यांना दि.१७ मे २०२० पर्यंत १५,१३४ फुड पॅकेट (खिचडी) तसेच गरजू कुटुंबाना ६६५ रेशन किट (पॅकेट) देण्यात आली आहेत.वरील सर्व फुड पॅकेट-रेशन पॅकेट जिल्हा शल्य चिकित्सक श्री.डाॅ.बोल्डे, डि वाय एस पी श्री.गणेश इंगळे,पीआय लाड व डॉ.मोरे यांच्या मार्गदर्शना खाली वितरीत करण्यात आली आहेत.रत्नागिरी जैन समाजाने नेहमीच संकटाच्या वेळी मदत करण्याची भूमिका घेतली आहे.आत्ता सुद्धा या कोरोनाच्या संकटकाळात रत्नागिरी जैन समाज आघाडीवर राहून मदत कार्य करत आहे.
www.konkantoday.com