
चिपळूण नगरपरिषदेत वाढीव कामांची बिले देऊ नका, असा पत्रव्यवहार करूनही ठेकेदारांची बिले दिल्याने शहर विकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला
चिपळूण नगरपरिषदेत वाढीव कामांची बिले देऊ नका, असा पत्रव्यवहार करूनही ठेकेदारांची बिले दिल्याने शहर विकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविषयी शनिवारी झालेल्या बैठकीत आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत नगरसेवक राजेश केळसकर यांनी वेळ पडल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला आहे
काही वर्षांपासून नगरपरिषद शहरात रस्त्यांची कामे करत आहे. मात्र, अनेक ठेकेदारांनी निविदेप्रमाणे कामे करताना, कधी नगरसेवक, कधी अधिकारी, तर कधी नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाची परवानगी घेऊन वाढीव कामे केली आहेत. शहरातील अनेक रस्त्यांचे काम या पद्धतीने करण्यात आली असून, या कामांची रक्कम काही कोटीत आहे.
www.konkantoday.com