कोरोनाच्या कॅन्टोन्मेंट झोनमध्ये ड्युटी बजावणार्या पोलीस कर्मचार्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप
दि.१९.०५.२०२० रोजी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचे संकल्पनेतून रत्नागिरी शहरामध्ये “कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (Containment Zone) या ठिकाणी अहोरात्र कर्तव्य बजाविलेल्या एकूण ९० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या हेतूने श्री, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी, डॉ.प्रविण मुंढे, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी तसेच श्री. विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम जी.जी.पी.एस. हायस्कूल, टिळक जिल्हा वाचनालय, गीता भवन, शेरे नाका,झाडगाव झोपडपट्टी, मुरुगवाडा तिटा, कुवारबांव व हातखंबा चेक पोस्ट या ठिकाणी १९-०५-२० रोजी सायकांळी ०५.०० ते ०६.३० या वेळेत पार पडला. सदर कार्यक्रमास प्रभारी पोलीस उपअधीक्षक,(मुख्यालय), पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण व शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com