महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू आदी राज्यांतील लोकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन ४.० घोषणा केली. तसेच राज्यात काय सुरू करायचे आणि काय नाही याचा विचार राज्यांनी करावा असे म्हटले. त्यामुळे काही राज्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपआपल्या राज्यात लॉकडाऊन ४.० हा ३१ मे पर्यंत ठेवण्याचे घोषित केले. पण कर्नाटक सरकारने लॉकडाऊन ४.० मध्ये मोठी सवलत देत सर्व दुकाने सुरू करण्यासह रोडवे आणि खासगी बस चालविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कठोर अंमलबजावणी कायम राहणार आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू आदी राज्यांतील लोकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात येऊ दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com