रत्नागिरी शहरातील ए.डी. नाईक हायस्कूल येथे क्वारंटाइन करून ठेवलेला इसम फरारी
रत्नागिरी शहरातील ए.डी.नाईक हायस्कूलमध्ये मुंबईहून आलेला असिफ शेख या इसमाची तपासणी करून त्याला क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.हा इसम मुंबईतून आल्यावर त्याची स्वॅबची तपासणी करण्यात आली होती.त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता त्याला ५ तारखेला १४ दिवसांसाठी ए.डी नाईक हायस्कूल येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते.काल हा इसम शाळेच्या बाथरूमच्या दरवाजातून उडी मारून पळून गेला त्याच्या विरोधात रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com