एमआयडीसी करणार दर गुरुवारी पाणी कपात
रत्नागिरी एमआयडीसीमार्फत नगरपालिकेला व जवळपासच्या बारा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो एमआयडीसीच्या धरणातून पाणी पुरवते त्या काजळी नदीच्या पाणीसाठा कमी झाल्याने पुरेश्या दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याने एमआयडीसीने दर गुरुवारी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे १४,२१,२८ मे व ४ जुन म्हणजे दर गुरुवारी एमआयडीसी पाणी पूर्ण बंद करणार आहे त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतीना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे
www.konkantoday.com