भारतीय जैन संघटना व जैन समाज रत्नागिरी तर्फे ‘डॉक्टर आपल्या दारी’ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन सुरू
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल जी मुथा जी यांच्या संकल्पने व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्या परवानगी ने “डाॅक्टर आपल्या दारी” या संकल्पने आधारीत मोबाईल डिस्पेन्सरी ओ.पी.डी. व्हॅन आज पर्यंत जवळजवळ महाराष्ट्रात 125 ठिकाणी व संपूर्ण देशात मिळून 166 ठिकाणी मोबाईल डिस्पेन्सरी ओ.पी.डी. व्हॅन सुरू आहेत.
भारतीय जैन संघटना, रत्नागिरी व फोर्स मोटर्स याच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय यांच्या सहकार्याने रविवार दि. 10-05-2020 पासून आपण “डाॅक्टर आपल्या दारी” या संकल्पने आधारीत मोबाईल डिस्पेन्सरी ओ.पी.डी. व्हॅन रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक श्री बोल्डे यांच्या हस्ते उद्घाटन करून भाट्ये येथून चेक-अप सुरू करण्यात आले.
मोबाईल डिस्पेन्सरी ओ.पी.डी.व्हॅन रत्नागिरीतील शहर परिसर, वाड्या, शहराच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणातील रहिवाश्यांचे ताप, सर्दी, खोकला इत्यादि आजारावर विनामूल्य चेक-अप करून तेथेच मोफत औषध वितरण करतील.
शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टसिंग व सॅनिटायझिंगच्या नियंमांचे योग्य पालन करून हा मोबाईल डिस्पेन्सरी ओ.पी.डी.व्हॅन चा हा उपक्रम आपण रत्नागिरीत करीत आहोत.
या उपक्रमाला रत्नागिरी चे आमदार श्री. उदय सामंत, जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा,रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक श्री बोल्डे व रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री डाॅ. प्रविण मुंढे यांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेचा, मुकेश गुंदेचा,सुरेश जैन,संजीव जैन,चेतन गांधी,आशिष कोठारी,किशोर शहा,सुनिल गांधी,मनोज गांधी हे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचा सर्व लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जैन संघटना, रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेचा यांनी आवाहन केले आले.